दीपिका – रणवीर विवाहबद्ध, कोंकणी पद्धतीने इटलीत झाला शाही विवाहसोहळा

Foto

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह केला आहे. इटलीतील लेक कोमो येथील व्हिलामध्ये निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. दोन दिवसांपासून लग्नविधी सुरु होते. मंगळवारी दीपिका-रणवीरचा कोंकणी पद्धतीने साखारपुडा झाला आणि दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी कोंकणी पद्धतीनेच विवाहसोहळा झाला. गुरुवारी ते सिंधी पद्धतने विवाहबद्ध होणार आहेत.

दीपिका-रणवीरच्या विवाहाल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह काही निवडक मित्र उपस्थित आहेत. या विवाहाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यास पाहुण्यांना सक्त मनाई करण्यात आली आहे. करण जोहरने ट्विट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने म्हटले आहे की हे जोडपे अतिशय सुंदर दिसत आहे. नजर उतर लो! करणने दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मुंबई होणार ग्रँट रिसेप्शन

इटलीला लग्नाला उपस्थित राहू न शकलेल्या बॉलिवूडमधील तारे-तारकांसाठी दीपिका-रणवीरने मुंबईतील ग्रँड हयात येथे शाही रिसेप्शन सोहळा आयोजित केला आहे. या पार्टीला संपूर्ण तारांगण येण्याची शक्यता आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker